Gender  
Age  

Location  
Lagngat
Lagngat
Logngat
Welcome to Jire Mali Samaj Seva Sangh's Matrimony WebSite.

लग्न ही केवळ आयुष्याचा जोडीदार मिळवुन देणारी व्यवस्था नसुन कुटुंब, गाव, समाज एकरूप करू शकणारी प्रक्रिया आहे. याचं भान वाड-वडिलांबरोबर आजच्या तरूण पिढीलाही नक्कीच आहे म्हणुनच ते आपल्या जोडीदार निवडीबाबत जागरूक बनले आहेत. अशा आधुनिक काळात तरूण पिढीतला वाढलेला चौकसपणा किंवा आई-वडिलांच्या आपल्या सुनेबद्दल किंवा जावयाबद्दल बदलत्या अपेक्षा नक्कीच स्वागर्ताह आहेत !!

सध्या जिवनशैली बदलत चालली आहे. परंपरागत चौकट ओलांडून जिवनाची क्षितीजं उंचावत आहेत. रोज सुर्योदयाबरोबर नव-नविन गोष्टींचा उदय होत आहे. थोडक्यात सांगायचे तर आधुनिकता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा अनेक कारणांनी आपले समाजबांधव मुळगाव सोडून देश-विदेशात विविध ठिकाणी वास्तव्यास जात आहेत आणि नकळत आपला समाज विखुरला जात आहे, विभक्त कुटुंबपध्दती रूजत आहे. म्हणुनच बदलत्या काळाबरोबर आपले लग्नाबदलचे दृष्टीकोन, अपेक्षा, नाते संबध आणि संदर्भही बदलत आहेत. पण असे सर्व असुनही लग्न संस्काराचे महत्व मात्र तेवढेच दृढ राहीले आहे.

याच पार्श्वभुमीवर आपलं व्यक्तिमत्व, आवडीनिवडी, जिवनपध्दती हयांचा विचार करून एक समजुतदार अन अर्थात ’अनुरूप’ जोडीदार मिळवुन देण्यासाठी आणि लग्नविषयक निर्णय सोपा व सहज व्हावा यासाठीच जिरेमाळीसमाज सेवा संघाच्या माध्यमातुन हा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. वधुवर संशोधन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विश्वासार्ह, व्यापक, नेमकी माहिती पुरवुन वेळ, पैसा आणि आई-वडिलांचे जोडे झिजवण्यापासुन वाचविण्यासाठी योग्य मार्गदर्शन हे ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट. व्यवहारिकता जपुन, वास्तवाचं भान ठेवुन, परस्परांच्या अपेक्षांचा मेळ घालत आणि एकमेकांची भावना जपत तुमची गाठ घालणं हेच आमचे काम !!

NEWS

lagngat