"जिरॆमाळी समाज सॆवा संघ महाराष्ट्र" राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलन-2023, दि. 23 डिसेंबर 2023 रोजी वाशीम येथे..!!



दरवर्षी प्रमाणे जिरेमाळी समाज सेवा संघाच्या अधिपत्याखालील, या वर्षीचे राज्यस्तरीय उपवर युवक युवती संमेलन "शनिवार,दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी, वाटाणे लॉन्स, मालेगाव रोड, वाशीम" येथे आयोजित करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात येत आहे.

आपणास आपल्या उपवर मुलगा / मुलगी यांची पुस्तिकेमध्ये नोंदणी करायची असल्यास किंवा जाहिरात द्यायची असल्यास दि २२ / ११ / २०२३ पर्यंत आपल्या गावातील नोंदणी प्रमुखांशी संपर्क करावा ही नम्र विनंती .🙏

नोंदणीसाठी अटी -



१) युवक वय २१ वर्ष तर युवतीचे १८ वर्षे पूर्ण असावे ( डिसेंबर २०२३ पर्यंत).

२) नोंदणी करायची असल्यास फॉर्म भरताना १ पासपोर्ट फोटो द्यावा लागेल (सध्याचा).

३) युवक युवतीची नोंदणी करून पुस्तिका पाहिजे असल्यास ३०० रु फिस लागेल . फक्त नोंदणी असल्यास फ्री असेल .

४) जाहिरात देताना सध्याचे फोटो द्यावेत . (जाहिरात दर सर्व कलर )

फुल पेज A4 साईज - ५००० रु

हाप पेज - ३००० रु .

1/4 पेज - १५०० रु

५) नोंदणी / जाहिरात देतानाच पावतीची रक्कम द्यावी उधार कुणीही घेऊ / देऊ नये . कारण ही सामाजिक बांधिलकी आहे .

६) जास्तीत - जास्त युवक युवती यांनी परिचय देण्यासाठी २३ / १२ / २०२३ रोजी वाशिम येथे हजर रहावे .

७) या उपवर युवक युवती मेळाव्यात ज्यांना आपल्या मुलामुलींचे विवाह पार पाडायचे असतील तशी त्यांनी सूचना करावी . अशा नवदांपत्यास डॉ विजयजी कानडे साहेब व श्री जी एन पायघन सर यांचेकडून संसारोपयोगी भांडे व कपडे घेण्यासाठी प्रत्येकी ५००० ( पाच हजार रु ) सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे .