संस्थेचे आवाहन१) प्रत्येक राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा सक्रिय सहभाग.

२) जिरेमाळी समाज सेवा संघाचा प्रचार व प्रसार - गावागावात, घरोघरी समाज बांधवांपर्यंत पोहचणे.

३) जिरेभुषण अव्याहत सुरु ठेवण्यासाठी कार्यकारिणीच्या प्रत्येक सदस्याने प्रथम स्वतः जिरेभुषणचे सदस्यत्व स्विकारणे तसेच समाजातील इतर जास्तीत जास्त सधन समाजबांधवांनी सदस्यत्व स्विकारणे.

४) जिरेभुषणचा खर्च भागविण्यासाठी समाज बांधवांनी जाहीराती व शुभेच्छा निरंतर पाठविणे.

५) समाजातील सधन बांधवांनी जिरेभुषण निरंतर सुरु रहण्यासाठी ठेव रक्कम ठेवणे अपेक्षित आहे. ही ठेव पुरेसे आजिवन सभासद झाल्यानंतर संबधितांना विनाव्याज परत करण्यात येईल.

६) प्रत्येक जिल्हा कार्यकारणीने सुरवातीस किमान १०० सदस्य ३ महिन्यांच्या आत करणे अपेक्षित आहे.

७) प्रत्येक जिल्हा अध्यक्षांनी किमान ६ महिन्यातून एक वेळा राज्यकार्यकरणी अध्यक्ष/सचिव/संघटक यांच्या उपस्थितीत जिल्हा शाखांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेणे अपेक्षित आहे.

८) जिल्हा शाखांनी आपल्या विभागातील समाजबांधवांची माहिती पत्ते, दुरध्वनी, मोबाईल इ. संकलीत करुन डिरेक्टरी/वेबसाईटवर प्रकाशित करण्यासाठी मध्यवर्ती कार्यकारणीकडे पाठवावी.

९) जिरेमाळी समाज सेवा संघाच्या वेबसाईट साठी इच्छुक वधुवरांची माहिती पाठविण्यात यावी.

१०) विदर्भाच्या सर्व जिल्हयातील साहित्यिक बांधवांकडून उत्तम लेखांची/मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

११) समाज बांधवांच्या विविध उपक्रमांची माहिती इतर बांधवांना करुन देण्याबरोबरच जिरेभुषणचा खर्च भागविण्यास मदत व्हावी यासाठी समाज बांधवांकडून त्याचे व्यवसाय, कारखाने, दुकाने, शुभेच्छापर संदेश इत्यादिच्या जाहिराती नियमितपणे मिळणे अपेक्षित आहे.