संस्थेने हाती घेतलेले नवीन प्रकल्प१) जिरेमाळी समाजसेवा संघाची वेबसाईट तयार करणे -

जिरेभुषाण बरोबरच देशातील व देशाबाहेरील समाज बांधवांना आपल्या समाजातील वधुवरांची माहिती मिळवण्यासाठी जिरेमाळी समाज सेवा संघाचे संकेतस्थळ (वेबसाईट) नाशिक येथील आपले बांधव श्री. प्रशांत सोनवणे यांनी मराठी भाषेतुन नावाने सुरु केलेली आहे. इंग्रजी भाषेसह इतर सुधारणा करण्याचे कार्यही सुरु असुन लवकरच समाजाची स्वयंपुर्ण संकेतस्थळ (वेबसाईट) आपल्या सेवेत रुजु होत आहे. जास्तीत जास्त समाजबांधवांनी या सेवेचा लाभ घ्यावयाचा असुन त्याबाबतची सविस्तर माहिती जिरेभुषणच्या अंकातून आपणापर्यंत पोहचविण्यात येईल.

२) सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन -

संस्थेच्या अधिपत्याखाली मागील तीन वर्षांपासून सामुदायीक विवाह सोहळा दरवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर येथे आयोजित करण्यात येतो. या वर्षीचा सामुदायीक विवाह सोहळा दिनांक १४ मे २०११ रोजी पिशोर येथे पार पडला. याच धरतीवर प्रत्येक जिल्हा शाखेने आपआपल्या जिल्ह्यात मोठया संख्येने समाज बांधव असलेल्या ठिकाणी सामुदायीक विवाह सोहळे आयोजित करण्याची जबाबदारी विभागीय उपाध्यक्ष, जिल्हाशाखा अध्यक्ष व जिल्हाकार्यकारीणी यांचेवर सोपविण्यात आहे. अन्य समाजबांधवांनी या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सुचित करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या सोहळ्याच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील सधन बांधव, नोकरदार वर्ग, व्यावसायीक इत्यादिंनी आर्थिक भार उचलावा अशी अपेक्षा आहे.

सन २०१२ मध्ये वाशीम जिल्ह्यात सामुदायीक विवाह सोहळ्याची सुरुवात करण्याचे कार्याध्याक्ष व जिल्हाशाखा प्रमुख श्री. किसनराव पुंड, श्री. संतोष सपकाळ, श्री. भागवत पुंड व इतर ग्रामस्थांनी ठरविले आहे.

त्याचप्रमाणे पिंपळनेर येथील श्री. डी. पी. पाटील, श्री. डी. टी. पाटील, श्री. रविन्द्र साळवे, साक्री येथील श्री. पगारे, श्री. गवळी सर व इतर समाजबांधवांच्या सहकार्यातून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सन २०१२ मध्ये सामुदायीक विवाह सुरु करण्यात येत आहे.

More Website Templates at TemplateMonster.com!
2012 Copy Right Jiremalisamaj.