संस्थेच्या हाती आगामी प्रकल्प


१) सर्व जिल्हाशाखांची क्रियाशिलता वाढविणे - सर्व जिल्हध्यक्षांनी आपआपल्या जिल्हाकार्यकारिणीतील सदस्यांच्या मदतीने संस्थेने ठरविलेल्या व इतर समाजोपयोगी कार्य संस्थेच्या नावाने पार पाडणे अपेक्षित आहे. कार्यकारिणीतील सदस्या व्यतिरिक्त इतर समाजबांधवांनी देखील संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभागी होणे समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. काही कारणास्तव सध्या कार्यरत सदस्यांना वेळ देणे शक्य नसल्यास अन्य इच्छूक क्रियाशिल व समाज कार्यास वेळ देऊ शकणाऱ्या बांधवांना कार्यकारणीत समाविष्ट करता येईल. अशी नावे मध्यवर्ती कार्यालयास कळविण्यात यावीत.

२) जिल्हा शाखांमार्फत तालुका/गाव पातळीवर शाखा निर्माण करणे - ज्या ठिकाणी जिरेमाळी समाज बहुसंख्येने रहात आहे अशा जवळपास सर्व जिल्हयांध्ये जिल्हाशाखा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाशाखानंतर प्रत्येक जिल्हयातील समाजाच्या तालुक्यांमध्ये व गावांमध्ये गावपातळीवर शाखा निर्माण करावयाच्या आहेत. विभागीय उपाध्याक्ष व जिल्हा अध्यक्षांनी गावातील प्रमुख समाज बांधवांच्या मदतीने अशा कार्यकारणीवरील सभासदांची निवड करुन मध्यवर्ती कार्यकारणीस कळवावयाची आहे.

३) प्रत्येक जिल्हयात बहुसंख्य समाज असलेल्या गावांमध्ये सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे - सामुदायीक विवाह ही काळाची गरज आहे. गोरगरीब समाज बांधवांचा पैसा निष्कारण वाया घालवुन, कर्जबाजारी होण्याची परंपरा अजुनही दुर्दैवाने सुरु आहे. औरंगाबाद जिल्हयातील जिशोर गावा प्रमाणेच अशा प्रकारचे सामुदायीक विवाह विभागीय उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली जिरेमाळी समाज सेवा संघाच्या अंतर्गत या वर्षीपासुनच जिल्हा शाखांनी आयोजित कराव्यात अशी विनंती आहे.

४) बचत गटाची स्थापना करणे - प्रत्येक जिल्हयातील गावांमध्ये बचत गट स्थापन करुन समाजातील स्त्रियांना रोजगार मिळवून देण्याबाबतची माहिती जिरेभुषण मधुन डॉ. साहेबराव क्षीरसागर यांनी क्रमशः प्रसिध्द केलेली आहे. बचत गट स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी डॉ. क्षिरसागर यांचेशी (मो. क्र. ९४२३१४५६७१) संपर्क करावा.

५) मदतकार्य करणे - आर्थिक दृष्ट्या कमकुवत समाजातील गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींसाठी मदत करणे, त्यासाठी सधन, दानशुर व्यक्तिंनी संस्थेस आर्थिक मदत करवी अशी विनंती आहे. शैक्षणिक विकासाची कार्ये पार पाडणे, शैक्षणिक सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

६)वसतिगृहे, वाचनालये, व्यायामशाळा स्थापन करुन चालविणे.

७) शेतकऱ्यांना शेतीविषयक व आधुनिक तंत्रज्ञानाबाब्त समाजातील तसेच समाजाबाहेरील कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन करणे, कृषी प्रदर्शने भरविणे.

८) विविध कार्यक्रमाद्वारे समाजबांधवांना एकत्र आणून जिरेमाळी आर्थिक, सामाजिक व राजकीय ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

More Website Templates at TemplateMonster.com!
2012 Copy Right Jiremalisamaj.