कै. सिताराम हरि सोनवणे (नेर) यांच्याकडील माहिती वरून



उत्तर ध्रुवाच्या आसपास १० महिने हिवाला व २ महिने उन्हाला असे. तेथे आर्यांचे मुळ ठिकाण असले पाहिजे. मध्य आशियामधुन ते इतस्तत: पसरले. जर्मन टोळ्यांचे लोक काळ्या समुद्राजवळ व नंतर जर्मनी, हालंड, बेल्जम, डेन्मार्क, स्वीडन, नार्वे इग्लंडमध्ये स्थायिक झाले. नंतर आर्यांच्या टोळ्या भिन्न भिन्न देशात निघुन गेल्यानंतर, जे आर्य दीर्घ कालीन एकत्र राहिले, त्यांच्यामध्ये उत्तर आर्य व दक्षिण आर्य लोक म्हणजे हिन्दुस्तानातील हे आर्य लोक प्रथम हिन्दुस्थानात खैबर खिंडीतून आले व गंगा यमुना नदीच्या आसपास वसाहती केल्या. या काळी काशी, कौशांबी, हस्तिनापूर अशी मोठाली गावे होती.

सगरवंशावळीच्या नोंदीवरून गंगा यमुना नदीच्या आसपास वसाहती केल्यानंतर एक वसाहत काशी येथे आली. नंतर काशीवरून अयोध्या, अयोध्याहून चार गाद्यांवर राज्य केले. कंदाहारवरून, उज्जैन नंतर बह्राणपूर तेथून पहूर, तेथून मुंगीपैठण तेथून नागापूर, पिशोर, तेथून जिरडगाव व जिरडगावहून सोनवणे कुळातील एक टोळी देश-शिरवाडे व दुसरी टोळी नेर येथे आली.

सोनवणे कुळातील एक भाऊ दबा पाटील यांचे पुत्र धांगू पाटील नेर येथे आले. त्यांनी मान्याचा व कानडयाचा बंधारा १२०० मोहरा खर्च करून शके १५५० (सन १६०८) मध्ये बांधला. धांगू पाटील यांनी पाटीलकी मिळवली. [’मांगते’ यांच्या दप्तरातील उतायावरून].