गुणगौरव सोहळा संपन्न, पिशॊर.- 16 जुलै 2023"



दिनांक 16 जुलै 2023 रोजी जिरे माळी समाज सेवा संघाच्या नवनिर्वाचित छ.संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने सन 2022-23 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पिशोर येथे समाज मंदिरात मोठ्या उत्साहात हजारो समाज बंधू भगिनी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जवळपास 175 गुणवंत विद्यार्थ्याचा तसेच अनेक नव्याने नियुक्ती मिळालेल्या बांधवांचा गौरव करण्यात आला. नवनिर्वाचित जील्हा, तालुका व पिशोर शाखेच्या पुढाकाराने हा पहिलाच भव्य दिव्य सोहळा अनिल माळी जिल्हाध्यक्ष, राजू मोकासे,वी.उपाध्यक्ष,राजू डहाके,ता.अध्यक्ष, रवी वाघ, जिल्हा सचिव व इतरांच्या प्रयत्नाने पार पडला. या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. राज्यातील 10 जिल्ह्यातील जिरेमाळी समाज सेवा संघाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते या बहारदार सोहळ्यास उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यासाठी मुंबईहुन जिरेमाळी समाज सेवा संघाचे संस्थापक श्री नारायण नवले , अध्यक्ष डॉ.विजयजी कानडे सर, नाशिकहून उद्योगपती श्री.चंद्रकांतजी बागुल,श्री.निंबा घरटे,ओबीसी सेल भाजप सरचिटणीस श्रीमती शालिनीताई बुंदे, औरंगाबाद हुन डॉ.धनवई सर,श्री.साळुबा श्री.डहाके,डी डी ,श्री.लांडगे सर,श्री.सांडू पाटील, प्रा.डॉ.सुर्यभान सनांसे, धुळे येथून श्री.डी.टी.पाटील, श्री.अनिल घरटे,श्री.प्रभाकर घरटे, जळगावहून श्री.विजय पाटील अध्यक्ष, सौ. जिजाबाई डोंगरे जिल्हा महीलाध्यक्ष, स्वा.सैनिक श्री.यादवराव तायडे, श्री. ज.गो.माळीसर, प्रा.मनोज मोकासे नाशिक ग्रा.महीलाध्यक्ष हेमलताताई मानकर सपत्नीक,सरलाताई डहाके सरपंच पिशोर , सुरेखाताई तायडे सरपंच नागापुर, वाशिम येथून श्री.संभाजी साळसुंदर,हिंगोली येथून श्री.बबन ढोले, श्री.लक्ष्मण ओपळकर, जालना जिल्हयातून श्री.किशोर तबडे, श्री.बाळू धनवई, श्री.विक्रम उखार्दे, उंडणगावहून अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ कानडे सरांनी समाजाची प्रगती होत असली तरी प्रमाण कमी असल्याचे व MPSC, UPSC द्वारे अधिकारी होण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे सांगितले. श्री चंद्रकांत बागुल यांनी विद्यार्थ्याना अतिशय सुंदररित्या शैक्षणिक तसेच व्यवसाय मार्गदर्शन केले. जिरेमाळी समाज सेवा संघाच्या विविध उपक्रमाद्वारे 17 जिल्ह्यातील समाज एकत्रीकरण चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण समाज एका छत्राखाली आणल्याची यशस्वी गाथा नवले साहेबांनी मांडली. प्रत्येक जिल्ह्यात समाज बांधवांच्या संस्थेप्रती असलेल्या विश्वासातून व आर्थिक सहकार्यातून मोठ - मोठे सोहळे नियमितपणे दरवर्षी लीलया पार पाडले जातात व हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे श्री.नवले साहेबांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणले. पिशोर व संपूर्ण जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिनातेकडे वळल्याचे सांगून त्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा व ईतर शाखांनी प्रयत्न करण्याचे सूचित केले. Acupuncture मधील डिप्लोमा कोर्स ची माहिती त्यानी दिली. गावातील तरुणांनी प्रगती करायची असेल तर नोकरी, उद्योग व्यवसायाकरिता गावाबाहेर पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शालिनीताई बुंधे, डॉ. धनवई सर, प्रा डी टी पाटील सर, हेमलता मानकर व अनेक समाज बांधवांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले. रोहिदास सावळे सरांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मोकासे ,अनिल माळी, रवि वाघ, राजु डहाके सर, साळवेसर, ज्ञानेश्वर नवले ,ज्ञानेश्वर खडके, संजय नवले , डी.के.ओपळकर सर, गोकुळ डहाके, धोंडुबाबा मोकासे, उमेश मोकासे , आन्ना नवले , पांडुरंग नवले ,बाळासाहेब मोकासे, अशोक मोकासे ,एकनाथ मोकासे , बबलु मोकासे डी.एन.ओपळकर सर, विजय डहाके,कृष्णा दवंगे, सुनिल कोल्हे, संतोष मोकासे , कैलासशेठ मोकासे , शंकरकाका मोकासे, अमोल मोकासे , गंगाधर धनवई, सह अनेक समाजसेवक व समाजबांधव, युवकांनी परीश्रम घेतले. (काही नांवे चुकून राहिली असल्यास त्यांची नांवे ॲड करुन रिपोस्ट करावे.) आपण सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, आभार व शुभेच्छा...!!!!!.

राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलन-अंतापूर, नाशिक.- २२ जानॆवारी २०२३"



या वर्षीचा उपवर युवक युवती परिचय संमेलनाचा कार्यक्रम अंतापुर - ताहाराबाद येथे 22 जानेवारी 2023 रोजी संपन्न होत आहे. युवक युवती परिचय व जीहिरतीचे फॉर्म व्हॉट्सॲप वर या पूर्वीच पाठविलेले आहेत. प्रिंटेड फॉर्म तसेच पावतींपुस्तके देखील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठविलेली आहेत. नाव नोंदणी पूर्णतः मोफत आहे. ज्यांना सोयरिक पुस्तिका हवी आहे त्यांनी रू.३००/- ची पावती नोंदणी प्रमुखांकडून घेऊन प्रत बुक करावी.

जिरेमाळी समाज सेवा संघ,महाराष्ट्र, वाशिम-हिंगोली जिल्हा शाखा आयोजित "गुणगौरव सोहळा."



दिनांक ३० ऑक्टोबर - जिरेमाळी समाज सेवा संघ,महाराष्ट्र जिल्हा शाखा वाशिम-हिंगोली यांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या समाज बांधवाच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रम दिनांक ३०/१०/२०२२ वार - रविवार कानडे इंटरनॅशनल स्कूल, शेलू बाजार रोड ,वाशिम येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिरेभूषण, बालरोगतज्ञ डॉ. विजयराव कानडे यांच्या उपस्थितीत जिरेमाळी समाजातील वाशिम व हिंगोली जिल्हयातील शेकडो गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी, सेवानिवृत्त तसेचे विविध क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी करणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी, महीला व पुरुष यांचा गुणगौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र व ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सत्कार मुर्ती वनिताताई बोऱ्हाडे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्पमित्र, प्रल्हाद पायघन सेवानिवृत्त अप्पर सचिव, आकाश पोपळघट एमआयटी अमेरिका येथे निवड,डॉ.आश्विनी ढोले बीडीएस यशस्वी व्यावसायीक,चि. अमर पायघन आरटिओ नवनियुक्त हे सत्कार मुर्ती असून दहावी,बारावी, पदवीधर,पदवीप्राप्त विधार्थी यांचा सत्कार केला आहे.

जिरेमाळी समाज सेवा संघ,महाराष्ट्र, धुळे जिल्हा शाखा आयोजित "गुणगौरव सोहळा."



दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी जिरेमाळी समाज सेवा संघाच्या अधिपत्याखाली "धुळे जिल्हा" शाखेमार्फत गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त समाज बंधू भगिनी, तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व समाज बांधवांचा " सत्कार सोहळा"  "मुरलीधर मंदिर, पिंपळनेर, जि धुळे " येथे मां. बापुसो ॲड. श्री.संभाजीराव पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

जिरेमाळी समाज सेवा संघाचे संस्थापक श्री.नारायण नवले, कोषाध्यक्ष श्री.किरण पगारे, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश जाधव, श्री.डी वाय सोनवणे धुळे जिल्ह्यातील श्री एस ए पाटील, श्री डी टी पाटील,श्री अण्णा नेरकर, श्री प्रकाश सोनू पाटील, श्री आनंदा पगारे उर्फ शिवानंद महाराज, रोशनी शाम पगारे, सुनीता रविंद्र पगारे, श्री राजेंद्र गवळी, डॉ राजेंद्र पगारे, डॉ भाग्यश्री पाटील, श्री व्ही एन जिरेपाटील, श्री विजय सोनवणे, श्री विजय पगारे, श्री गोविंद पुराणिक, श्री सतीश घरटे, श्री शाम पगारे, श्री अनिल सोनवणे, श्री अनिल घरटे, श्री संजय साळवे, श्री गिरीश पगारे, श्री प्रभाकर पगारे, श्री प्रभाकर घरटे, श्री निलेश ससले,श्री प्रकाश नंदन, श्री निलेश पगारे आणि इतर अनेक ठिकाणाहून 400-450 समाज बांधव उपस्थित होते. जवळपास 200 गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळवलेले समाजबांधव, विद्यार्थी व निवृत्त समाज बांधव यांचा सत्कार करण्यात आला.

धुळे येथील गुणगौरव सोहळ्याचे आयोजन जिरे माळी समाज सेवा संघाचे श्री रवींद्र साळवे, श्री अनिल घरटे, श्री सतिष घरटे, श्री डी.टी. पाटील सर, श्री गिरीश पगारे,इतर कार्यकर्ते व समाबांधवांनी केले होते.या सोहळ्यात उपस्थित असलेल्या श्री.संभाजीराव पगारे, संस्थेचे संस्थापक श्री नारायण नवले, श्री एस. ए पाटील, सौ. भाग्यश्री पाटील,श्री डी. टी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. श्री एस ए पाटील यांच्या निधी गोळा करण्याबाबत च्या वक्तव्यावर गोरगरीबांकडून निधी गोळा करण्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या सबळ लोकांकडून पैसे जमा करण्याची ॲड.बापूसो संभाजी पगारे यांनी सूचना केली. जिरे माळी समाज सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत राहून समाज एकत्र आणला.त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे , असे सांगून एकत्र आलेला समाज वेगवेगळ्या संस्थांमुळे दुरावणार नाही याची नवींन संस्थानी काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. सौ. भाग्यश्री पाटील यांनी, "मुलींनी ध्येय निश्चित करून लग्नानंतर का होईना ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे" हे स्वतःचेच उदाहरण देऊन सांगितले.श्री नारायण नवले साहेबांनी श्री एस ए पाटील यांनी खंत व्यक्त केल्याप्रमाणे मुलांनी स्वबळाने चांगले गुण मिळविणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या निधी गोळा करण्या संदर्भात, वेगवेगळ्या संस्था निर्माण करून समाजात दूफळी माजवण्याचा प्रयत्न या पूर्वीही झाला होता.तो परत होऊ देऊ नका, जिरे माळी समाज सेवा संघाच्या अधिपत्याखाली  इतिहासात प्रथमच एकत्र आलेल्या या समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करू नका, अशी सूचना केली. जिरेमाळी समाज सेवा संघाने सुरू केलेला "9 वा युवक-युवती परिचय संमेलन सोहळा" यावर्षी "अंतापुर, जिल्हा- नाशिक येथे जानेवारी 2023" मध्ये होत असल्याचे त्यांनी घोषित केले. धुळे जिल्ह्यातील  सर्व समाज बांधवानी या कार्यक्रमात सर्वोतोपरी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.नाशिक प्रमाणेच धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर येथे सुंदर असा नयनरम्य सोहळा पार पडला.

जिरेमाळी समाज सेवा संघ,महाराष्ट्र, नाशिक शहर जिल्हा शाखा आयोजित "गुणगौरव सोहळा.""



नमस्कार,दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी जिरेमाळी समाज सेवा संघाच्या अधिपत्याखाली नाशिक शहर जिल्हा शाखेमार्फत गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त समाज बंधू भगिनी, तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व समाज बांधवांचा "नेत्रदीपक सत्कार सोहळा" मोठ्या दिमाखात "साई हॉल ,नाशिक" येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मुंबईहून जिरेमाळी समाज सेवा संघाचे संस्थापक श्री.नारायण नवले, कोषाध्यक्ष श्री.किरण पगारे, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश जाधव, श्री.डी वाय सोनवणे नाशिक येथील उद्योजक श्री.चंद्रकांत बागुल, श्री.अनिल जाधव, साई हालचे मालक श्री. मुरलीधर साळवे  महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी श्री. जे. एन. साळवे, श्री. शामराव मानकर, श्री.जाधव पुणे येथून श्री.प्रज्योत नहीरे, श्री.नहीरे,सौ. नहीरे, श्री.साहेबराव नंदन, श्री. ललित साळवे, धुळे येथून प्रा.श्री. एम.एच. पाटील. या कार्यक्रमास नाशिक शहर व अन्य ठिकाणाहून 600-700 समाज बांधव उपस्थित होते. जवळपास 200 गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळवलेले समाजबांधव, विद्यार्थी व निवृत्त समाज बांधव यांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नाशिक शहर अध्यक्ष श्री.संजय मोगरे,  श्री.निंबा जाधव, श्री.राजेन्द्र भगत, श्री.ज्ञानेश्वर घरटे, श्री.कमलाकर घरटे, श्री.भरत साळवे श्री. ललित घरटे, देविदास पगारे, शरद नंदन, मानकर रावसाहेब, घरटे मुलीधर मानकर, सुभाष नंदन, दिपक पगारे, यांनी सुंदररित्या केले.

या सोहळ्यात उपस्थित असलेल्या श्री.जे.एन.साळवे, श्री. अनिल जाधव,श्री.चंद्रकांत बागुल, सौ. नहीरे,श्री. किरण पगारे, श्री.नारायण नवले यांनी मार्गदर्शन केले.  श्री.साळवे याने जिरेमाळी समाज सेवा संघाच्या सत्कार सोहळ्याला एवढ्या मोठ्या संख्येने बांधव आणि भगिनी उपस्थित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मला ही अशा प्रकारचे कार्य या संस्थेबरोबर करण्याची ईच्छा त्यांनी प्रदर्शित केली व संस्थेचे व श्री.नवले साहेब, श्री.पगारे साहेबाच्या कार्याचे कौतुक केले. समाजात अनेक संघटनांमुळे समाजात द्वीधा मनस्थिती होते व समाज दुरावत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री बागुल साहेबांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. श्री.अनिल जाधव यांनी समाज बांधवानी व्यवसायाकडे व राजकारणाकडे वळण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. सौ. नहीरे यांनी पालकांनी आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देण्याचे गरज असल्याचे सांगितले. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.किरण पगारे यांनी संस्थेच्या कार्याबाबत तसेच नाशिक शहर शाखेने सुंदररित्या आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांचे विषेशतः श्री.संजय मोगरे, श्री.निंबा जाधव व ईतर कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण देताना त्यांनी श्री. किशोर वाघ ,मुंबई यांनी त्यांना पत्नी व मुलीच्या दुर्दैवी निधनानंतर ही 6 महिन्यात संस्थेचे कार्य पुन्हा त्याच जोमाने सुरू केल्याचे सांगितले. तरुण व्यावसायिक श्री. प्रज्योत नहीरे, यांनी संस्थेच्या समाज एकत्रीकरण उद्दिष्ठाचे कौतुक करून त्यांनी पुणे येथे सुरू केलेल्या विश्वनाथ फाउंडेशनच्या फायर सेफ्टी , ITI आणि ईतर अभ्यासक्रमांना कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांच्या  पाल्यांना मोफत प्रवेश देणार असल्याचे जाहीर केले.जिरेमाळी समाज सेवा संघाचे संस्थापक श्री. नारायण नवले यांनी संस्थेची उत्पत्ती ही प्रामुख्याने सर्व जिरे माळी समाज एकात्रिकरणाच्या उद्देशाने झाल्याचे सांगून संस्थेच्या उपक्रमाची तसेच आतापर्यंतच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे जिल्हा, तालुका, ग्राम पातळीवर राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये पसरले आहेत व सर्व जिल्हा, तालुका, ग्राम, महिला, युवा शाखा निर्माण केल्याचे सांगून इतिहासात प्रथमच संपूर्ण जिरेमाळी समाज एकत्र आणल्याचे सांगितले. परंतु समाजातील काही उच्च शिक्षित व तथाकथित नेते आपल्या स्वार्थासाठी, नावासाठी हा एकत्र आलेला समाज वेगवेगळ्या संस्था स्थापन करून विघटित करण्याचे प्रयत्न करीत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. समाजातील जुन्या जाणत्या सामाजिक कार्यकर्त्यानी, समाज धुरणानी व समाज बांधवांनी ही प्रवृत्ती रोखन्याचे, त्यास प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले. जिरेमाळी समाज सेवा संघाने सुरू केलेला "9 वा युवक-युवती परिचय संमेलन सोहळा" यावर्षी अंतापुर, जिल्हा- नाशिक येथे 'जानेवारी 2023" मध्ये होत असल्याचे घोषित केले. नाशिक शहरातील व संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवानी या कार्यक्रमात सर्वोतोपरी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. जवळपास 5 तास चाललेला कार्यक्रम सायंकाळी 6.30 वा आभार प्रदर्शनाने संपला. एक आनंदमय सोहळा प्रसन्नपणे उत्साहात पार पडला.

मुंबई ठाणे जिल्हा शाखा आयोजित."गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न..!!"



दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी जिरेमाळी समाज सेवा संघाच्या मुंबई ठाणे जिल्हा शाखा आयोजित गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त व पदोन्नती मिळालेल्या समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा अंबरनाथ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अंबरनाथ सारख्या मुंबई ठाण्या पासून दूरवरच्या ठिकाणी प्रथमच आयोजित या कार्यक्रमास पाऊस व रेल्वे मेगाब्लॉक असतांनाही समाज बांधवांनी प्रचंड गर्दी केली. संस्थेप्रतीचा विश्वास व आदर पुन्हा यांतून दिसून आला.मा.श्री मधुकरजी भोगे सर अध्यक्षस्थानी होते तर प्रसिद्ध उद्योगपती श्री. चंद्रकांतजी बागुल सर, औरंगाबादहून विशेष श्रीमती शालिनीताई बुंधे, श्री.सुरेश देशमुख, श्री.सुरेश आंबेकर (अवर सचिव), श्री.बी डी इंगळे,नवी मुंबईचे श्री.अनिलदादा खडके(असोसिएट डायरेक्टर, Kyndryl ),ताहाराबादचे तरुण कार्यकर्ते प्रज्योत नहिरे हे सपत्नीक उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक श्री नारायण नवले, कोषाध्यक्ष श्री किरण पगारे, श्री.प्रकाश जाधव,श्री.पांडुरंग टेंपे सर,श्री.संजय ढोले,श्री.श्रीराम साळोकार, श्री.किशोरभाऊ वाघ,श्री.हेमंत पगारे,श्री.विकास जिरी, श्रीमती.सीमाताई पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्याना उचित मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक श्री.नवले सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेऊन मार्गदर्शन केले. संस्थेच्या कार्यात सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याचे व पुढे येऊन स्वतःहून सामाजिक कार्यात झोकून देण्याऱ्या कार्यकर्त्यांची अत्यंत गरज असल्याचे सांगून अशा तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले. लवकरच सर्व जिल्हा व ईतर शाखा सदस्यांची निवड करण्यात येणार असून ईच्छुक व क्रियाशील बांधवांनी समाज कार्यासाठी सहभागी होण्याचेही आवाहन केले. हा कार्यक्रम मुख्यतः कल्याण तालुका शाखेने परिश्रमपूर्वक यशस्वी केला, त्यास टिटवाळा, बदलापूर, ठाणे, मुंबई येथील समाज बांधवांनी उत्तम असं सहकार्य केले. श्री निलेश घरटे यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट दिल्या. श्री. भोगे साहेबांनी सर्व सोईंसुविधांनी युक्त सुंदर असा हॉल उपलब्ध करून दिला. अनेक समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देणगी दाखल निधी उपलब्ध करून दिला.

श्री.डी.वाय.सोनवणे, श्री. देविदास पाटील, श्री.सतीश झगडे, श्री.मनोहर घरटे, श्री. संजय सोनवणे, श्री.रमाकांत सोनवणे,श्री.दयानंद नवरे,ॲड.दिनेश जिरे,.सौ.शितल सावळे, सौ.सीमाताई पाटील,सौ.सुनिता सतिष झगडे, व इतर महिला मंडळीं तसेच ईतर असंख्य समाज बांधवांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कार्यक्रम उत्तमपणे यशस्वी केला.या सर्वांचे जिरेमाळी समाज सेवा संघाच्या वतीने श्री.नवले सरांनी हार्दिक अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानले.

जिरेमाळी समाज सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखा "गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा."



जिरेमाळी समाज सेवा संघाच्या वतीने गुंज येथे दहावी,बारावी व इतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन माता पायरिका संस्थानच्या सभागृहात दि.२८.०८.२०२२, रविवारी करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या वतीने प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिरेमाळी समाज सेवा संघाचे संस्थापक श्री.नारायण नवले साहेब मुंबई तसेच सौ. ज्योतीताई कानडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सूचनेनुसार श्री बोरगडे सरांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा शाखेची श्री शैलेशजी अनखुळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना करण्यात आली. तसेच उमरखेड, पुसद, महागाव तालुका शाखांची पुनर्रचना करण्यात आली. सर्व शाखांच्या सदस्यांचे मा. नवले साहेबांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री नवले साहेबांनी कोरोना नंतर २ वर्षांनी विद्यार्थी सत्कार सोहळे राज्यभर साजरे करीत असल्याचे सांगून गुंज येथील सुंदर सोहळ्याच्या आयोजकांची व विशेषतः श्री बोरागडे सरांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी संस्थेच्या ईतर सर्व उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्याना १० वी, १२वी नंतरच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले.या वर्षीचा युवक युवती परिचय संमेलन लवकरच नाशिक/धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. "प्रत्येक समाजाला धनवंतापेक्षा गुणवंताची खुप गरज आहे." त्यामुळे समाजातील अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी एक सामाजिक दायित्व म्हणुन जिरेमाळी समाज सेवा संघ,जिल्हा शाखेच्या वतीने महागाव, पुसद ,उमरखेड या तिन्ही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रा. जांभुळकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.गजानन अनखुळे यांनी मांडली तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ज्योतीताई विजय कानडे, श्री.परमेश्वर पुंड (विभागीय संघटक),श्री. शैलेश अनखुळे जिल्हाध्यक्ष श्री.गजानन भोने, प्रा.संभाजी शामसुंदर ,श्री.रतिराव बोरगडे ,प्रशांत बोराडे,ॲड. श्री.चंद्रकांत शामसुंदर, श्री.संजय भोने ,श्री.ज्ञानेश्वर वाशिमकर, श्री.माधवराव दैत ,श्री.गजानन खंदारे,श्री. दिपक डोईफोडे,श्री. प्रकाश गोरे ,श्री.अंबादास कानडे, श्री.गणेश तोडकर ,श्री.शिवाजी बोरगडे, तंटामुक्ती अध्यक्ष पो.पाटील श्री.भास्कर भोने, श्री.ज्ञानेश्वर भोने ही व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष सहकार्य श्री.गजानन गुंजकर, श्री.ज्ञानेश्वर गोरे, श्री.प्रभाकर अनखुळे, श्री.सचिन गोरे ,श्री.गजानन टोंम्पे, श्री.विष्णु लाहबर, श्री. महेश काळे ,श्री.किशोर गोरे ,श्री.किशोर पायघन ,श्री.अवधुत मते व विश्वेश्वर ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे सर्व संचालक यांनी केले. कार्यक्रमासाठी जिरेमाळी समाज सेवा संघ व माळी युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव श्री.रमेश गोरे यांनी केले तर आभार श्री.प्रमोद जाधव यांनी मानले..!! असा हा एक आनंदमय सोहळा प्रसन्न वातावरणात पार पडला.